Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

फडणवीस, पवारांनी धनंजय मुंडेंना सहआरोपी करावे – मनोज जरांगे

Updated: नोव्हेंबर 29, 2025

By Vivek Sindhu

फडणवीस, पवारांनी धनंजय मुंडेंना सहआरोपी करावे - मनोज जरांगे

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज – संतोष देशमुख यांचा खून करणाऱ्या आरोपीची धनंजय मुंडेंना आठवण येते, केवळ मतांसाठी ते भर सभेत आरोपीची आठवण काढतात. याचा अर्थ धनंजय मुंडे आणि आरोपी एकच आहेत. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी मुंडेंना सहआरोपी केले पाहिजे. धनंजय मुंडेंना सहआरोपी करीत अटक केली. तर संतोष देशमुख यांना न्याय मिळेल नसता फडणवीस हेच आरोपी सोडून देत आहेत असा त्याचा अर्थ होईल. असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.
मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या हत्येला शनिवारी तिथीनुसार एक वर्ष पूर्ण झाले. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त मनोज जरांगे यांनी देशमुख यांना आदरांजली वाहिली. यावेळी माध्यमांशी मनोज जरांगे पाटील हे बोलत होते.

पुढे मनोज जरांगे पाटील म्हणाले की, अजित पवारांनी धनंजय मुंडेंना स्टार पंम्चर का काही तरी केले आहे. ही अजित पवारांची भूमिका आहे. इतक्या नीच प्रवृत्तीच्या माणसाला तुम्ही पद देतात त्यांनी कोणती जात सोडली हो. परळीत कोणत्या जातीला त्रास दिला नाही त्यांनी. परळीमधील सर्व जातीच्या लोकांना या टोळीने त्रास दिला आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची गेल्यावर्षी २९ नोव्हेंबर रोजी अपहर करून अत्यंत निघृण हत्या करण्यात आली होती. आज त्यांच्या संतोष देशमुख यांचे पहिले पुण्यस्मरण आहे. त्यानिमित्ताने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना असे म्हटले आहे.

अजित पवारांकडे दुसरे ओबीसी नेते नाही का?

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, अजित पवार यांचा पक्ष चांगला आहे पण हा नासका माणूस सांभाळून ते पक्षाच्या इमेजला डाग लावून घेत आहे. अजित पवारांच्या पक्षात ओबीसीचे चांगले दुसरे नेते नाहीत का? त्यांनी दुसरे नेते सांभाळले पाहिजे. त्यांना मोठे केले तर तुमचा पक्ष मोठा होईल हे नासका सांभाळायची गरज नाही, याला आम्हीच सरळ करतो.


Categories

Recent Posts