Breaking

युद्धामुळे गॅस टंचाईचे संकट: केंद्र सरकारकडून देशभरात ‘एस्मा’ कायदा लागू

Updated: मार्च 10, 2026

By Vivek Sindhu

युद्धामुळे गॅस टंचाईचे संकट: केंद्र सरकारकडून देशभरात 'एस्मा' कायदा लागू

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

आखाती देशांमध्ये अमेरिका, इस्रायल आणि इराणदरम्यान सुरू असलेल्या ११ दिवसांच्या भीषण युद्धामुळे भारताचा खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात घरगुती आणि व्यावसायिक गॅसचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने केंद्र सरकारने आता कठोर पावले उचलली आहेत. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून देशभरात ‘एस्मा’ (आवश्यक सेवा पुरवठा अधिनियम) कायदा लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या कायद्यामुळे इंधनाची साठवणूक आणि काळा बाजार करणाऱ्यांवर आता कडक कायदेशीर निर्बंध येतील. तसेच, केंद्र सरकारने तेल शुद्धीकरण कारखान्यांना एलपीजी उत्पादन वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. १९६८ च्या या कायद्यानुसार आता इंधन पुरवठ्याशी संबंधित सेवा आणि कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहणे अनिवार्य असून, अत्यावश्यक सेवा खंडित होणार नाहीत याची खबरदारी घेतली जात आहे. युद्धजन्य परिस्थितीत देशाची इंधन सुरक्षा आणि पुरवठा साखळी सुरळीत राखण्यासाठी सरकारने हे मोठे पाऊल उचलले आहे.


Categories

Recent Posts