Breaking

गेवराईत भररस्त्यात राडा; कारच्या धडकेवरून टोळक्याचा पती-पत्नीवर हल्ला

Updated: मार्च 28, 2026

By Vivek Sindhu

गेवराईत भररस्त्यात राडा; कारच्या धडकेवरून टोळक्याचा पती-पत्नीवर हल्ला

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

गेवराई: शहरातील राज गल्लीत स्कुटीला कारची धडक लागल्याच्या किरकोळ कारणावरून एका टोळक्याने पती-पत्नीला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात लोखंडी टॉमी आणि गजाचा वापर करण्यात आला असून, फिर्यादी तरुण गंभीर जखमी झाला आहे.

अरबाज जब्बार शेख (वय २४, रा. तय्यब नगर, गेवराई) हे आपल्या पत्नीसह स्कुटीवरून सामान आणण्यासाठी गेले होते. राज गल्लीतील एका बेकरीसमोर उभी असलेली स्विफ्ट कार (क्र. एमएच २० झेड २२३) अचानक रिव्हर्स आल्याने अरबाज यांच्या स्कुटीला धडकली. गाडी व्यवस्थित चालव असे अरबाज यांनी चालकाला सांगितले असता, आरोपींनी त्यांना घेराव घातला. फहीम उर्फ शोले रहीमोद्दीन शेख याने लोखंडी टॉमीने अरबाज यांच्या डोक्यात जोरात प्रहार केला, ज्यामुळे त्यांचे डोके फुटून गंभीर दुखापत झाली.

या मारहाणीत इतर आरोपींनी लोखंडी गजाचा वापर केला असून अरबाज यांच्या पत्नीलाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी फहीम शेख, जावेद हमीदराज शेख, नवीद जावेदराज, उबेद नय्युम शेख आणि नय्युम रहीमोद्दीन शेख यांच्यासह एकूण सहा जणांविरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक बारगजे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


Categories

Recent Posts