Breaking
Updated: सप्टेंबर 8, 2025
गुन्हा वापस घेण्यासाठी मजुराला विटाने मारहाण
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड : तालुक्यातील बोरखेड येथे जुन्या गुन्ह्याचा तक्रार परत घेण्यासाठी दबाव आणत मजुराला विटाने मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी नेकनुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी अनिल सुनिल काळे (वय ३०, व्यवसाय मजुरी, रा. बोरखेड, जि. बीड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ५ सप्टेंबर रोजी सकाळी आठच्या सुमारास ते त्यांच्या राहत्या घरासमोरील मोकळ्या जागेत उभे असताना आरोपी जिजाबाई अनिल पवार, दिपक अनिल पवार, रमेश शिवाजी पवार (सर्व रा. बोरखेड) आणि नाना रोहीदास यांनी एकत्र येऊन “तू आमच्यावर नेकनुर पोलीस ठाण्यात दाखल केलेला गुन्हा परत घे” असा धमकीचा इशारा दिला.
यावेळी आरोपींनी शिवीगाळ करत अनिल काळे यांना विटाने मारून जखमी केले. दरम्यान फिर्यादीची पत्नी सोडवायला आली असता तिलाही आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सर्व आरोपींनी मिळून फिर्यादीला “जर गुन्हा परत घेतला नाही तर जिवंत सोडणार नाही” अशी धमकी दिली.
या प्रकरणी नेकनुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोह राउत करीत आहेत.