Breaking
Updated: मार्च 4, 2026
स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयातील माजी सहयोगी प्रा. डॉ. सुनील तपसे यांची आत्महत्या
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज: बिदर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील न्यायवैद्यकशास्त्र विभागप्रमुख डॉ. सुनील तपसे यांनी ३ मार्च रोजी चंदन सावरगाव (ता . केज) येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. ५७ वर्षीय डॉ. तपसे हे दीर्घकाळापासून आजारी होते आणि याच व्याधीला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
अंबाजोगाई येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी सहयोगी प्राध्यापक म्हणून त्यांनी प्रदीर्घ काळ सेवा दिली होती. त्यांच्या निधनाची बातमी समजताच चंदन सावरगाव आणि अंबाजोगाई परिसरात शोककळा पसरली असून वैद्यकीय क्षेत्रातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे. आज सकाळी त्यांच्या मूळ गावी शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे.