Breaking

हुंड्यासाठी छळ करून विवाहितेची हत्या; पतीसह सासरच्या पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा

Updated: एप्रिल 2, 2026

By Vivek Sindhu

पतीसह सासरच्या पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने गेवराई तालुक्यातील एका हृदयद्रावक हुंडाबळी प्रकरणात ऐतिहासिक निकाल सुनावला आहे. हुंड्यासाठी विवाहिता संगीता कुऱ्हाडे हिचा अतोनात छळ करून तिला जाळून मारणाऱ्या आणि पुरावा नष्ट करण्यासाठी जिवंत असतानाच विहिरीत फेकणाऱ्या पतीसह सासरच्या पाच जणांना जन्मठेपेची कठोर शिक्षा देण्यात आली आहे. जुलै २०१६ मध्ये घडलेल्या या अमानवीय घटनेत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आनंद एल. यावलकर यांनी आरोपींना दोषी ठरवत प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

संगीताचा ट्रॅक्टरसाठी दोन लाख रुपये आणण्यासाठी शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. तिने अंगावर रॉकेल ओतून घेतल्यानंतर आरोपींनी तिला वाचवण्याऐवजी गोधडीत बांधून विहिरीत फेकून दिले. सरकारी वकील ॲड. अजय तांदळे यांनी मांडलेले १२ साक्षीदार आणि वैद्यकीय पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने पती एकनाथ, सासरे चंद्रभान, सासू फुलाबाई आणि चुलत सासरच्या दोघांनाही ही कडक शिक्षा सुनावली आहे. या निकालाने नराधमांना कायद्याचा दणका मिळाला असून पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळाला आहे.


Categories

Recent Posts