Breaking

आईला शिवीगाळ का दिली? विचारल्याच्या रागातून विटेने जीवघेणा हल्ला

Updated: एप्रिल 3, 2026

By Vivek Sindhu

केवळ दीडशे रुपयांसाठी तरुणावर वस्तऱ्याने हल्ला

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

आष्टी: आष्टी तालुक्यातील रुटी येथे आईला शिवीगाळ केल्याचा जाब विचारणाऱ्या तरुणावर विटेने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. राजु संतराम नागरे (वय ३८, व्यवसाय ड्रायव्हर, रा. रुटी) हे तुळजाई मंदिरासमोर उभे असताना त्यांनी शेजारी राहणाऱ्या आजिनाथ उत्तम गोल्हार याला “तू माझ्या आईला वारंवार शिव्या का देतोस?” असे विचारले. याचा राग धरून आरोपी आजिनाथ गोल्हार याने मंदिरासमोर पडलेली वीट उचलली आणि राजु यांच्या डाव्या बाजूच्या कानावर जोरात प्रहार केला.

इतक्यावरच न थांबता आरोपीने पुन्हा तीच वीट घेऊन राजु यांच्या डाव्या बरगडीवर मारून त्यांना अंतर्गत दुखापत केली. यावेळी आरोपीने फिर्यादीला घाणेरडी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देखील दिली. जखमी राजु नागरे यांनी याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार बाडघे करत आहेत.


Categories

Recent Posts