Breaking
Updated: ऑगस्ट 30, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड दि.३० : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीड तालुक्यातील नामलगाव फाटा येथील उड्डाणपुलाजवळ शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास झालेल्या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने सहा जणांना चिरडले. यात चौघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत आणि जखमी हे पेंडगाव येथे दर्शनासाठी जात असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मात्र मृत आणि जखमींची नावे अद्याप स्पष्ट झाली नाहीत.
काही दिवसांपूर्वी गढी उड्डाणपुलाजवळ अशाच प्रकारे कंटेनरच्या धडकेत पाच ते सहा जणांचा मृत्यू झाला होता. वारंवार होणाऱ्या अशा अपघातांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान, बीड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कारवाई सुरू केली असून कंटेनर चालकाला ताब्यात घेतले आहे.