Breaking
Updated: फेब्रुवारी 18, 2026
वाघेबाभूळगाव तलावावरून शेतकऱ्याचे ३१ हजाराचे स्टार्टर, वायर लंपास
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – वाघेबाभूळगाव (ता. केज) येथील तलावावरून एका शेतकऱ्याचे ३१ हजार तीनशे रुपयांचे स्टार्टर, वायर लंपास केल्याप्रकरणी केज ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
मुंडेवाडी (ता. केज) येथील किंचक आश्रुबा घोळवे या शेतकऱ्याने वाघेबाभूळगाव मध्यम प्रकल्पावरून पाईपलाईन करून शेतात पाणी आणले आहे. ६ फेब्रुवारी रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास २५ हजार रुपयांचे तलावावरील विद्युत मोटारचे स्टार्टर आणि ६ हजार तीनशे रुपयांचे वायर असा ३१ हजार तीनशे रुपये किंमतीचे मुद्देमाल संस्कार सोनाजी हावळे (रा. वाघेबाभुळगाव) व इतरांनी चोरून नेला. अशी तक्रार किंचक घोळवे यांनी दिल्यावरून संस्कार हावळे व इतर जणांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास जमादार राजू वंजारे हे करीत आहेत.