Breaking

देवगाव येथे शेतकऱ्याचे डोके फोडले 

Updated: मार्च 16, 2026

By Vivek Sindhu

देवगाव येथे शेतकऱ्याचे डोके फोडले

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज  -देवगाव (ता. केज) येथील रणजित चंद्रवदन मुंडे (वय ५१) हे शेतकऱ्याची पत्नी व मुले पुण्याला वास्तव्यास असून त्यांनी गावातील शिवाजी मुंडे यांच्या दोन रूम किरायाने केल्या आहेत. १५ मार्च रोजी रात्री आठ वाजता घरमालकाचा चुलत मेव्हणा विकास महादेव नागरगोजे हा दारूच्या नशेत त्यांच्याकडे आला. त्याने तु माझ्या बहिणीच्या घरी सामान ठेवण्यासाठी किरायाने केलेल्या रुमची चावी दे म्हणाला. त्यांनी त्याला चावी काढून दिली. त्यांनतर रणजित मुंडे हे आईच्या घराकडे निघाले असता विकास नागरगोजे याने विनाकारण शिवीगाळ करून डोक्यात दगड मारून डोके फोडले. १६ मार्च रोजी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून विकास नागरगोजे विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक फौजदार बाबासाहेब सानप हे तपास करताहेत.


Categories

Recent Posts