Breaking
Updated: एप्रिल 3, 2026
पिकांचे पंचनामे करुन मदत करण्याची शेतकर्यांची मागणी
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – बीड जिल्ह्यासह केज तालुक्यात गेल्या तीन-चार दिवसापासून सतत अवकाळी पाऊस पडत असल्याने शेतकर्यांची शेतातील उभी पिके नष्ट होत आहेत. या पिकांची तात्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना योग्य मदतषकरण्याची मागणी शेतकरी सरकारकडे करत आहेत.
शेतकरी म्हटले की सतत संकटावर मात करणारा जगाचा पोशिंदा अशी त्याची ओळख असली तरी जगाचा राजा म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते आणि त्याच्यावर ज्यावेळी नैसर्गिक संकट येते त्यावेळेस मात्र सरकार याच बळीराजावर कानाडोळा करत असल्याचे पहावयास मिळते. कारण गेल्या तीन ते चार दिवसापासून बीड जिल्ह्यासह केज तालुक्यात अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात होत आहे आणि यापुढे तीन चार दिवस अवकाळी पाऊस हवामान खात्याने अंदाज वर्तवलेला असल्यामुळे आधीच उभी पिके जमिनीत गाडी जात असताना पुन्हा तीन-चार दिवस अवकाळी पावसाच्या अंदाजाने शेतकरी जमिनीत गाडला जातो की काय ? अशी शंका उपस्थित होत आहे. कारण शेतकऱ्यांची सद्याची रब्बीची पिके गहू, ज्वारी तसेच टरबूज, खरबूज आणि आंगूर बागा व आंबा यासारखी फळपिके उभी असताना हा अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात बरसत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी या पिकांमध्ये नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे उभ्या असणाऱ्या आणि अवकाळी पावसाने कायमची झोपी घातलेल्या पिकांची सरकारने पंचनामे करून त्यांना मदत करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
गेल्या तीन चार दिवसापासून केज तालुक्यात कुठे ना कुठे मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस पडत आहे. यामुळे रब्बीची पिके आणि ईतर पिके जमिनीत गाडली गेली आहे . त्यामुळे प्रशासनाने पंचनामे करुन शेतकर्यांना मदतीचा हात द्यावा.
-दिनकर जाधव , शेतकरी