Breaking
Updated: मार्च 10, 2026
पाटोदा येथे माजी सैनिकाची तर गेवराईत शेतकऱ्याची आत्महत्या
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड जिल्ह्यात आत्महत्येच्या दोन वेगवेगळ्या घटनांनी खळबळ उडाली असून पाटोदा येथे एका निवृत्त लष्करी जवानाने तर गेवराईत एका शेतकऱ्याने आपले जीवन संपवले आहे. पाटोदा येथील माऊली नगर भागात राहणारे उद्धव जायभाय या माजी सैनिकाने राहत्या घरासमोरील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली, त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दुसऱ्या घटनेत गेवराई तालुक्यातील पौळाचीवाडी येथील रखमाजी नारायण जाधव या शेतकऱ्याने नैराश्यातून विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. बीड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.