Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

एसबीआय ग्राहक सेवा केंद्राचे शटर तोडून सव्वा लाखाची रोकड लंपास

Updated: डिसेंबर 20, 2025

By Vivek Sindhu

शिवरस्त्याच्या वादावरून शेतकऱ्याला बेदम मारहाण

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

परळी: परळी शहरात चोरीची एक मोठी घटना समोर आली असून अज्ञात चोरट्यांनी एका ग्राहक सेवा केंद्राला लक्ष्य केले आहे. हनुमान चौक परिसरातील माणिक नगर भागात असलेल्या एसबीआय ग्राहक सेवा केंद्राचे शटर तोडून चोरट्यांनी १ लाख १४ हजार ३०० रुपयांची रोकड लंपास केली आहे. या घटनेमुळे व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कन्हेरवाडी येथील रहिवासी वैभव बाळू रोडे (वय २६ वर्षे) हे हनुमान चौक परिसरात एसबीआयचे ग्राहक सेवा केंद्र चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. १८ डिसेंबर २०२५ रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास त्यांनी नेहमीप्रमाणे केंद्र बंद केले होते. दिवसभराच्या व्यवहारातील १ लाख १४ हजार ३०० रुपयांची रोख रक्कम त्यांनी टेबलच्या ड्रॉवरमध्ये सुरक्षित ठेवली होती. मात्र, १९ डिसेंबरच्या सकाळी सात वाजेच्या सुमारास शेजारील दुकानदार नामदेव मुंडे यांनी वैभव यांना फोन करून त्यांच्या दुकानाचे शटर उघडे असल्याचे आणि चोरी झाल्याचा संशय असल्याचे कळवले.

वैभव रोडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता, दुकानाच्या शटरचे कुलूप तुटलेले आढळले. टेबलचा ड्रॉवर उघडा होता आणि त्यातील सर्व रोकड गायब होती. या प्रकरणी वैभव रोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून परळी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Categories

Recent Posts