Breaking
Updated: July 20, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channel‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा
Join Groupगेवराई : अभियंत्रिकी शिक्षण घेत असलेल्या २१ वर्षीय तरुणाला प्रेमसंबंधाच्या पार्श्वभूमीवर मुलीच्या नातेवाईकांनी अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना गेवराई तालुक्यातील गंगावाडी येथे घडली होती. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, या प्रकरणाने गावात खळबळ उडाली आहे.
मृत तरुणाचे नाव शिवम काशिनाथ चिकणे (वय २१, रा. गंगावाडी) असे आहे. तो सध्या अभियंत्रिकीचे शिक्षण घेत होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवमचा गावातीलच एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. काही दिवसांपूर्वी त्याच्या प्रेयसीने त्याला घरी बोलावले होते. त्यावेळी अचानक तिचे नातेवाईक घरी आले आणि दोघांमध्ये वाद निर्माण झाला.
वादानंतर संतप्त नातेवाईकांनी शिवमचा पाठलाग करून त्याला रस्त्यात गाठले आणि लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली. गंभीर जखमी अवस्थेत त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मुलीच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे, तर उर्वरित आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. या घटनेत आता खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, प्रेमसंबंधातून घडलेल्या या हत्येने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अधिक तपास तलवाडा पोलीस करत आहेत.