Breaking
Updated: सप्टेंबर 16, 2025
एएसपी चेतना तिडके यांच्या निदर्शनास आला प्रकार
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड : सोलापूरबीड महामार्गावर भरधाव वेगात आलेल्या एसटी महामंडळाच्या इलेक्ट्रिक बसने दोन हॉटेलांना जोरदार धडक दिल्याने मोठे नुकसान झाले. ही घटना दि. 15 सप्टेंबर रोजी मध्यरात्री पाली शिवार येथे घडली.
फिर्यादी राम तुकाराम धनवडे (वय 43, रा. पाली, ता. बीड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते आपल्या आशीर्वाद ढाबा हॉटेलमध्ये रात्री झोपलेले असताना पहाटे 12.15 वाजता मोठा आवाज झाला. बाहेर येऊन पाहिले असता एसटी महामंडळाची इलेक्ट्रिक बस (क्र. MH 23 AU 6220) ही हॉटेल आशीर्वाद ढाबा व लगतचे अश्विनी ढाबा हॉटेलमध्ये घुसली होती.
या अपघातात आशीर्वाद ढाब्याचे पत्रे, लोखंडी चॅनल, शटर, काउंटर, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स, भिंत यासह अंदाजे 8 लाख रुपयांचे तर अश्विनी ढाब्याचे शेड, टेबल, खुर्च्या व सिमेंट पट्ट्या यासह अंदाजे 70 हजार रुपयांचे असे एकूण 8 लाख 70 हजार रुपयांचे नुकसान झाले.
तपासाअंती सदर बस सिताराम गोपीनाथ पवार (वय 35) याने चालवित असल्याचे निष्पन्न झाले. त्याने निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात घडवून आणल्यामुळे बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोह जायभाये करत आहेत.