Breaking

वृद्ध पेन्शनर महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावले

Updated: मार्च 27, 2026

By Vivek Sindhu

वृद्ध पेन्शनर महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावले

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड: शहरात चैन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, एका ६५ वर्षीय वृद्ध पेन्शनर महिलेच्या गळ्यातील तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण दोन अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा हिसकावून नेले आहे. या घटनेमुळे परिसरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शकुंतला रमेश कावडे (वय ६५, रा. एकनाथ नगर, बीड) या बुधवारी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास इंदिरा गांधी उर्दू शाळा बालपीर परिसरातून जात होत्या. यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्यांना गाठले. काही समजायच्या आत चोरट्यांनी शकुंतला यांच्या गळ्यातील सुमारे तीन तोळे वजनाचे जुने वापरते सोन्याचे गंठण बळजबरीने हिसकावले आणि मोटारसायकलवरून वेगाने पळ काढला.

या जबरी चोरीच्या प्रकारानंतर शकुंतला कावडे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली आहे. चोरीला गेलेल्या या दागिन्यांची किंमत फिर्यादीनुसार सुमारे २१ हजार रुपये आहे. शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात दोन इसमांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०४(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक काटकर करत आहेत.


Categories

Recent Posts