Breaking
Updated: जानेवारी 8, 2026
ग्रामसेवकाच्या कामात अडथळा
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelधारूर: भरदिवसा पोलीस असल्याचा बनाव करून एका वृद्ध शेतकऱ्याची फसवणूक करून सोन्याची अंगठी चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार धारूर शहरात घडला आहे. चंद्रकांत गोविंदराव तिडके, वय ६६ वर्षे, राहणार रुई धारूर हे ७ जानेवारी रोजी दुपारी १२:४० वाजता बस स्थानकाकडून बँकेकडे जात असताना एका अनोळखी इसमाने त्यांना अडवले. ‘मी पोलीस खात्यात आहे, तुमच्याकडे काय सामान आहे ते तपासायचे आहे’ असे म्हणून त्या भामट्याने तिडके यांचा विश्वास संपादन केला.
तपासणीच्या बहाण्याने त्या अज्ञात इसमाने तिडके यांच्या हातातील २५ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी घेतली. त्यानंतर हातचलाखी करून त्याने तिडके यांना दुसरी जुनी अंगठी देऊन त्यांची खरी सोन्याची अंगठी लंपास केली आणि दुचाकीवरून पसार झाला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिडके यांनी पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी धारूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार दुधाने या गुन्ह्याचा तपास करत आहेत.