Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

वृद्ध दिरास निलगिरीच्या लाकडाने केली मारहाण

Updated: जानेवारी 16, 2026

By Vivek Sindhu

वृद्ध दिरास निलगिरीच्या लाकडाने केली मारहाण

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज – एका वृद्ध दिरास भावजयीने निलगिरीच्या लाकडाने हाताच्या पोटरीवर व डोळ्यावर मारहाण करीत जखमी केले. तर लहान भावाने शिवीगाळ केल्याची घटना वाकडी (ता. केज) येथे घडली.
वाकडी येथील चंद्रकांत आश्रुबा कदम (वय ६५) हे शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये दररोज मुक्कामी असतात. त्यांचा लहान भाऊ वालचंद आश्रुबा कदम व त्याची पत्नी अश्विनी कदम हे दोघे सतत कुरापत काढून त्यांच्यासोबत भांडण करीत विनयभंग, बलात्काराच्या खोट्या तक्रारी करुन जेलमध्ये टाकण्याच्या धमक्या देतात. १४ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता वालचंद याने पहार कुठे आहे अशी विचारणा करीत त्यांना शिवीगाळ करीत पुन्हा बघतो म्हणून निघून गेला. रात्री साडेदहा वाजता परत वालचंद हा त्याची पत्नी अश्विनी हिच्यासोबत शिव्या देत आला. ते विनाकारण शिव्या देऊ नको असे म्हणाले असता अश्विनी हिने चापट मारत निलगिरीच्या लाकडाने हाताच्या पोटरीवर व डोळ्यावर मारहाण करीत जखमी केले. अशी तक्रार चंद्रकांत कदम यांनी दिल्यावरून वालचंद कदम, अश्विनी कदम विरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.


Categories

Recent Posts