आष्टी : मौजे शिराळ (ता. आष्टी) येथील भिल्ल वस्तीमध्ये काढण्यात आलेल्या एकलव्य जयंती मिरवणुकीत विनापरवाना पिस्तूल हातात धरून सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.