Breaking
Updated: June 14, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channel‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा
Join Groupतेलगाव – भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका व्यक्तीस जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार झाल्याची दुर्घटना शुक्रवारी सायंकाळच्या वेळी घडली.दरम्यान घटनेची माहिती समजताच दिंद्रुड पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
यासंदर्भात समजलेली माहिती अशी की,केज येथील शेख आसरफ बाबा मियाॅ हे शुक्रवार दि.१३ जुन रोजी सायंकाळी सहा ते साडे सहा वाजे दरम्यान भोगलवाडी फाटा येथील बस स्टॉपवर थांबले होते.
यावेळी धारूरकडुन भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने शेख आसरफ बाबा मियाॅ यांना जोराची धडक दिली.यात शेख आसरफ हे धडक बसताच जागीच ठार झाले.
धडक दिलेले वाहन कांही क्षणातच घटनास्थळारून पसार झाले.यावेळी भोगलवाडी फाट्यावर असलेल्या लोकांनी अपघात जागेवर जाऊन त्या व्यक्तीस तात्काळ उचलत दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न केला.परंतु ते जागीच ठार झाले होते.प्रथम त्याची ओळख पटत नव्हती.
मात्र त्यांच्या जवळील आधारकार्डवरून त्यांची ओळख पटुन त्यांचे नाव शेख आसरफ बाबा मियाॅ रा.टिपु सुलतान चौक केज असे असल्याचे निष्पन्न झाले.या घटनेची माहिती समजताच दिंद्रुड पोलीस ठाण्याचे सपोनि महादेव ढाकणे व त्यांचे सहकारी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन,त्यांची घटनास्थळाची व घटनेची पाहणी करून प्रेत शवविच्छेदनासाठी धारूर ग्रामीण रूग्णालयात पाठवले.