Breaking

दुचाकी पडताच ट्रकने दुचाकीला फरफटत नेले ; एक ठार – एक जखमी

Updated: June 10, 2025

By Vivek Sindhu

दुचाकी पडताच ट्रकने दुचाकीला फरफटत नेले ; एक ठार - एक जखमी

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा

Join Group

अंधारात जळालेली बस न दिसल्याने अपघात

केज – अंधारात जळालेली बस न दिसल्याने दुचाकी चालकाचा ताबा सुटल्याने दुचाकी रस्त्यावर पडताच आलेल्या ट्रकने दुचाकीला फरफटत नेले. या अपघातात दुचाकीवरील गंभीर जखमी झालेल्या दोघांपैकी एकाचा मृत्यू झाल्याची घटना केज – कळंब रस्त्यावर चिंचोली फाट्यापासून जवळ घडली.


केजहून कळंबकडे निघालेली एसटी बस (एम. एच. ११ बीएल ९३७५) ही ९ जून रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास केज ते साळेगाव दरम्यान चिंचोली पाटीजवळ असलेल्या शेख फरीद बाबा दर्ग्याजवळ अचानक पटल्यानंतर जळालेल्या अवस्थेत अंधारात रस्त्यावर उभी होती.

याचवेळी गणेश कल्याण हाके व अशोक बबन हाके (रा. माळेवाडी ता. केज) हे दोघे केजकडून साळेगावकडे दुचाकीवर (एम. एच. ४४ एबी ६२३४) जात असताना ही जळालेली बस अंधारात न दिसल्याने त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी पडली. यावेळी कळंबकडून केजकडे जात असलेल्या एका अवजड ट्रकने (एम. एच. १० एस. ७९१६) त्यांच्या दुचाकीला १०० ते १५० फूट फरफट नेले.

या अपघातात गणेश हाके व अशोक हाके हे दोघे गंभीर झाले. त्यांना उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता अशोक बबन हाके यांचा मृत्यू झाला. अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरज हजारे यांनी दिली.