Breaking
Updated: एप्रिल 7, 2026
हायवा अडवून चालकाला बेदम मारहाण; गाडीची मोडतोड
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelमाजलगाव: माजलगाव तालुक्यातील सरवरपिंपळगाव शिवारात एका भरधाव हायवा ट्रकला अडवून चार जणांनी चालकाला लोखंडी पाईपने मारहाण करून गाडीच्या काचा फोडल्याची घटना घडली आहे. आतिकखान इस्माईलखान पठाण या ३३ वर्षीय चालकाने याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ५ एप्रिल रोजी सायंकाळी ही घटना घडली.
आरोपी भागवत प्रकाशराव शेजूळ, महेश वसंत शेजूळ, रुपी गोळेकर आणि गजाजन दामोदर शेजूळ यांनी आतिकखान यांचा हायवा अडवला. त्यानंतर आरोपींनी लोखंडी पाईप आणि लाकडी काठीने आतिकखान यांच्या पाठीवर आणि छातीवर प्रहार केले. इतक्यावरच न थांबता आरोपींनी हायवाचा समोरील मोठा काच, इंडिकेटर आणि हेडलाईट फोडून नुकसान केले. “परत इकडे दिसला तर गाडी जाळून टाकू” अशी धमकीही आरोपींनी दिली. पोलीस हवालदार देवडे या प्रकरणाचा तपास करत आहेत.