Breaking
Updated: नोव्हेंबर 26, 2025
दोन गटात हाणामारी ; चौघांवर गुन्हा
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – कुंबेफळ (ता. केज) येथे दोन गटात हाणामारी झाल्याची घटना २५ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.४५ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी दोन्ही गटाच्या चौघांविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.
कुंबेफळ येथील बालासाहेब थोरात यांच्या फिर्यादीनुसार त्यांचा भाऊ विष्णू थोरात यांना शेखर थोरात, विशाल थोरात हे दोघे ग्रामपंचायतीसमोर विनाकारण हुज्जत घालून शिवीगाळ व जीवे मारण्याच्या धमक्या देत चापटाबुक्याने मारहाण करत होते. ते सोडविण्यास गेले असता त्यांच्या कॉलरला धरून हात पाठीमागे ओढून पिरगळुन वाकडा व फॅक्चर केला.
दुसऱ्या गटाचे शेखर थोरात यांच्या फिर्यादीनुसार त्यांनी ग्रामपंचायतीकडे माहिती अधिकारातून मागितलेल्या माहिती संदर्भात चलन भरली पावती देण्यास गेले असता त्यांना ग्रामसेविका रेवती रोकडे या माहिती देण्यास आणखी १० ते १५ दिवस लागतील असे म्हणाल्या. त्यांना लेखी मागत त्यांनी मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग सुरू केले असता उपसरपंच श्रद्धा थोरात यांचे पती विष्णू थोरात यांनी विरोध करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण करून ग्रामपंचायतीच्या बाहेर काढले. दगड व गज मारून दुखापत केली. तर बालासाहेब थोरातने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.