Breaking
Updated: July 3, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channel‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा
Join Groupकेज – कोर्टात केस मागे घेण्यासह तणनाशकाने पीक जळाल्यावरून दोन गटात कुऱ्हाड, कोयते, स्पिक्लरच्या लोखंडी पाईपने तुंबळ हाणामारी झाली असून या मारहाणीत पाच जखमी झाल्याची घटना डोका (ता. केज) येथे १ जुलै रोजी सायंकाळी घडली. याप्रकरणी केज पोलिसात नऊ जणांविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.
डोका येथील सुनील भरत भांगे याच्या तक्रारीनुसार १ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता शेतातील विहीरीवरील मोटार बंद करून घरी परत येत असताना त्यांना शेताचे शेजारी सागर विक्रम भांगे, विशाल विक्रम भांगे या दोघा भावांनी कोर्टातील केस मिटवून घेण्यावरून कुऱ्हाडीने डोक्यात तर स्पिक्लरच्या लोखंडी पाईपने हाताच्या खुब्यावर मारहाण करीत जखमी केले.
त्यांची पत्नी बबीता हिच्या डोक्यात कुऱ्हाड मारून जखमी केले. तर त्यांचे वडील भरत यांच्या डोक्यात मारल्याने कानातून रक्त निघाले. कोर्टातील केस मागे न घेतल्यास हातपाय तोडण्याची व जीवे मारण्याची धमकी दिली. सुरेखा विक्रम भांगे, प्रियंका विशाल भांगे, शारदा सागर भांगे या महिलांनी त्यांच्या पत्नीच्या केसाला धरून तर वडीलांना लाथाबुक्यांनी मारहाण केली.
अशी तक्रार सुनिल भांगे याने दिल्यावरून सागर भांगे, विशाल भांगे, सुरेखा भांगे, प्रियंका भांगे, शारदा भांगे या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
दुसऱ्या गटाचे सागर विक्रम भांगे यांच्या फिर्यादीनुसार ते १ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजता सोयाबीनची पाहणी करीत असताना करपलेले दिसून आल्याने त्यांनी सुनील भांगे यास उसावर तणनाशक फवारल्याने सोयाबीन जळाली म्हणाले. तेवढ्यात भरत भागवत भांगे याने त्यांच्या डोक्यात कुऱ्हाडीचा तुंबा मारल्याने ते खाली पडले.
याचवेळी सुनील याने कुऱ्हाडीच्या तुंब्याने कानाच्या बाजुला व कोयत्याने पायाचे गुडघ्यावर मारून दुखापत केली. त्यांची आई सुरेखा हिस बबीता सुनिल भांगे हिने दगडांनी पाठीत, डोक्यात मारहाण केली.
त्यांचा भाऊ विशाल भांगे, भावजयी प्रियंका भांगे या दोघांना सुनिल भांगे, भरत भांगे, बबीता भांगे, उषाबाई भांगे या चौघांनी काठीने, लोखंडी पाईपाने व चापटाबुक्याने मारहाण केली. आता वाचलात, यानंतर सोडणार नाहीत, अशी धमकी दिली. अशी तक्रार सागर भांगे यांनी दिल्यावरून सुनिल भांगे, भरत भांगे, बबीता भांगे, उषाबाई भांगे या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास जमादार बाबासाहेब बांगर हे करीत आहेत.