बीड – शहरातील स्वामी समर्थ मंदिराच्या बाजूला असलेल्या सिद्धिविनायक भोजनालया समोरून जात असताना दोन अज्ञात चोरट्यांनी गळयातील मिनी गंठण लंपास केल्याची घटना रविवार (दि.8) सायंकाळी 6 च्या दरम्यान घडली असून चोरटयांनी 70,800 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची प्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिल्पा अमोल वाव्हळ (वय 38) व्यवसाय घरकाम रा. फुलाईनगर बीड ह्या शहरातील स्वामी समर्थ मंदिराच्या बाजूला असलेल्या सिद्धिविनायक भोजनालया समोरून पाई चालत जात असताना दोन अज्ञात चोरटयांनी त्यांच्या गळ्यातील 13 ग्रॅमचे मिनी गंठण असा एकूण 70,800 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना रविवार (दि.8) सायंकाळी 6 च्या दरम्यान घडली.
असून अज्ञात दोन चोरट्यांविरुद्ध बीड शहर पोलीस ठाण्यात (दि.8) जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.