Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

डिघोळअंबा येथे देशी दारू पकडली

Updated: नोव्हेंबर 29, 2025

By Vivek Sindhu

डिघोळअंबा येथे देशी दारू पकडली

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज – युसुफवडगाव पोलिसांनी डिघोळअंबा शिवारात छापा मारून देशी दारूची चोरटी विक्री करणाऱ्यास पकडले. त्याच्याकडील देशी दारूच्या ८० बाटल्या जप्त केल्या.
अंबाजोगाई तालुक्यातील डिघोळअंबा शिवारातील एका हॉटेलच्या पाठीमागे एक इसम चोरून देशी दारूची विक्री करीत असल्याच्या माहिती मिळताच युसुफवडगाव ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या आदेशावरून फौजदार भारत बर्डे, सहाय्यक फौजदार मोरे, पोलीस शिपाई धनंजय कारले यांच्या पथकाने २८ नोव्हेंबर रोजी दुपारी १.३० वाजता छापा मारला. पोलिसांनी श्रीकृष्ण लहुदास साखरे (रा. चिंचपुर ता. धारुर) यास ताब्यात घेऊन झडती घेतली असता तीन हजार दोनशे रुपयांच्या देशी दारूच्या ८० बाटल्या मिळून आल्या. पोलीस शिपाई धनंजय कारले यांच्या फिर्यादीवरून श्रीकृष्ण साखरेविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.


Categories

Recent Posts