Breaking
Updated: एप्रिल 8, 2026
धारूर पोलिसांची जलद कारवाई
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelधारूर – धारूर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या चोरीच्या गुन्ह्याचा तपास अवघ्या दीड तासात पोलिसां नी छडा लावत दोन आरोपींना अटक केली आहे. या तात्काळ कारवाईमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक केले जात .आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धारूर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता .कलम ३०९ (४), (६) गुन्हा क्रमांक 130/2026
अंतर्गत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा नोंद होताच पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करून अल्पावधीत आरोपींचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे मनोज उर्फ सोन्या चंद्रकांत घोळवे (वय १९, रा. आंबे वडगाव) आणि सुमित प्रमोद कांगने (वय १९, रा. धुनकवड, ता. धारूर) अशी आहेत. आरोपींकडून सुमारे ६८ हजार ३० रुपये किमतीच्या विविध
रंगांच्या बॉक्सेस जप्त करण्यात आले आहेत. तसेच गुन्ह्यात वापरलेली मारुती ८०० चारचाकी, एअर गन, चाकू आणि कोयता यांसारखी साधनेही पोलिसांनी जप्त केली आहेत.
पोलिसांनी पंचनामा करून मुद्देमाल ताब्यात घेतला असून या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू आहे हि करवाई नवनीत कावत. अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके साहेब पोलीस आधीक्षक वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे पोलीस उपनिरीक्षक बाबसाहेब भवर पोलीस उपनिरीक्षक भाताने हेड कॉ मुंडे शेख आदी पोलीसांनी केली वअटक आरोपींकडून अधिक गुन्ह्यांचा उलगडा करण्यासाठी पोलिस कसून तपास सुरू आहे .