Breaking

उत्पादन शुल्क विभागाचा केज तालुक्यात दोन ठिकाणी छापा : देशी दारू दुकानातील बेकायशीर साठा जप्त

Updated: डिसेंबर 31, 2025

By Vivek Sindhu

माजलगावात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा छापा; १० लाखांचा मुद्देमाल जप्त

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज/गौतम बचुटे

उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी केज तालुक्यातील दोन देशी दारू दुकानावर छापा टाकला. या कारवाईत त्यांना बेकायदेशीर अवैध्य दारूचा साठा आढळून आल्याने तो दारूचा माल जप्त केला आहे.

या बाबतची माहिती अशी की, दि. २८ डिसेंबर रोजी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी केज आणि साळेगाव येथील सरकारमान्य देशी दुकानावर छापा टाकला. या कारवाईत दोन्ही ठिकाणी त्यांना अवैध्यरित्या वाहतूक परवाना नसलेला बेकायदेशीर दारूचा साठा आढळून आला. सदर बेकायदेशीर साठा करून ठेवलेला दारूचा साठा उत्पादन शुल्क विभागाने ताब्यात घेतला आहे. अद्याप प्रकरणी उत्पादन शुल्क विभागाने कारवाई बाबत सविस्तर माहिती दिलेली नाही. मात्र अशा प्रकारच्या बेकायदेशीर दारू प्राशन केल्याने नागरिकांच्या जीविताला अपाय आणि धोका संभवत असल्याची चर्चा सुरू आहे. तसेच अनेक ठिकाणी सुरू असलेले धाबे आणि हॉटेल्स यावर राजरोसपणे देशी आणि विदेशी बनावट व आरोग्याला अपायकारक मद्यविक्री होत असताना उत्पादन शुल्क विभागाची याकडे डोळेझाक होत असल्याची चर्चा सुरू आहे.


केज आणि साळेगाव येथील कारवाईत बेकायदेशीररित्या असलेला देशी दारूचा साठा आम्ही ताब्यात घेतला असून गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.
— विशाल मोहाळे,
उत्पादन शुल्क अधिकारी, अंबाजोगाई


Categories

Recent Posts