Breaking
Updated: जानेवारी 30, 2026
कर्जदाराने जमीनदाराला केली विळ्याने मारहाण
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelगौतम बचुटे/केज :- ट्रॅक्टरसाठी घेतलेले कर्जाचे हप्ते वेळेवर भरा असे जामीनदाराने सांगितल्याचा राग आल्याने कर्जदाराने चक्क जामीनदारालाच विळ्याने मारहाण करून जखमी केले आहे.
युसुफवडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या अंबाजोगाई तालुक्यातील अंजनपूर येथील अशोक साहेबराव देशमुख आणि त्यांचे वडील साहेबराव देशमुख यांनी हनुमंत नामदेव जाधव, विकास हनुमंत जाधव यांना बँके कडून कर्जावर ट्रॅक्टर घेण्यासाठी त्यांच्या शेताचे ७/१२ व ८-अ देऊन ते त्यांचे जामीनदार आहेत. मात्र ट्रॅक्टर घेतल्या पासून सन २०२२ पासून ते ट्रॅक्टरचे कर्जाचे परतफेडीचे हप्ते नियमित भरीत नाहीत. दरम्यान अशोक देशमुख यांचा ऊस रांजणी येथील नॅचरल शुगर येथे गेला आहे. मात्र त्याच्या खात्यावर ऊसाचे पैसे जमा झालेले असताना सुद्धा ते हनुमंत जाधव व विकास जाधव यांच्या ट्रॅक्टरच्या कर्जाचे जामीनदार असल्याने अशोक देशमुख यांचे बँक खाते लॉक केले आहे. त्यामुळे अशोक देशमुख हे दि. २७ जानेवारी रोजी दुपारी ३:०० वा. चे सुमारास अशोक देशमुख हे शेताकडे जात असतांना त्यांना त्रिंबक व्यंकट भोसले यांचे शेताचे जवळ रस्त्यावर ट्रॅक्टर आणि हनुमंत नामदेव जाधव व विकास हनुमंत जाधव हे दोघे भेटले. त्यांना अशोक देशमुख म्हणाले की, “तुम्ही ट्रॅक्टरचे पैसे न भरल्यामुळे माझे ऊसाचे पैसे बँकेने रोखुन धरले आहे.” ” मला पैशाची खूप अडचण आहे.” असे म्हणताच विकास हनुमंत जाधव म्हणाला की, “मी पैसे भरणार नाही.” असे म्हणुन त्याने शिविगाळ करण्यास सुरुवात केली. त्याचे वडिल हनुमंत नामदेव जाधव याने त्याचे हातातील विळ्याने अशोक देशमुख यांच्या डावे हाताच्या अंगठ्यावर मारुन जखमी केले.
अशोक देशमुख यांच्या तक्रारी वरून हनुमंत नामदेव जाधव व विकास हनुमंत जाधव यांच्या विरुद्ध युसुफवडगाव पोलिस ठाण्यात गु. र. न. २५/२०२६ भा. न्या. सं. ११५(२), ११८, ३५१(२), ३५२, ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाय्यक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल अरुण मोरे तपास करीत आहेत.