Breaking
Updated: May 29, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channel‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा
Join Groupखा.बजरंग सोनवणेंची केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे मागणी, अहिल्यानगरपर्यंत रेल्वे सुरू करण्यासाठी आग्रह
बीड: दौंड-इंदोर एक्सप्रेस गाडीला ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर एक्सप्रेस’ असे नाव देण्यात यावे, तसेच या गाडीचा विस्तार अहिल्यानगर (अहमदनगर) पर्यंत करावा, अशी मागणी बीडचे खा.बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे योगदान महाराष्ट्र व मध्यप्रदेशासाठी अतुलनिय आहे. त्यांच्या स्मृतीस आदरांजली ठरावी आणि या भागातील प्रवाशांना अधिक सोयीचा रेल्वेमार्ग उपलब्ध व्हावा, हा यामागचा उद्देश आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, दौंड-इंदोर या रेल्वेगाडीस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर एक्सप्रेस असे नाव देण्यात यावे, अहिल्यादेवी होळकर यांचे योगदान महाराष्ट्रासह मध्यप्रदेशसह अनेक राज्यात महत्वपूर्ण आहे.
सदरील गाडीला अहिल्यादेवी यांचे नाव दिल्यास सदरील रेल्वेला नवी ओळख मिळेल. सदरील गाडी आता इंदोर ते दौंड अशी चालत आहे. सदरील गाडीचा विस्तार करून अहिल्यानगरपर्यंत करणे आवश्यक आहे. तसे झाल्यास मराठवाड्यातील यात्रेकरू भाविकांना याचा लाभ होईल. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकरांचे जन्मस्थान चौंडी हे आहिल्यानगर जिल्ह्यात आहे. जन्मस्थान आणि राजधानीशी जोडणारी ही रेल्वे ठरेल.
मराठवाड्यातील नागरिकांना थेट इंदोरला जाणे सोपे होईल. सदरील सेवा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३००वी जन्म जयंती ३१ मे रोजी येत असल्याने ३० मे २०२५ पासूनच सुरू करावी, यामुळे जन्मदिनानिमीत्त हा सन्मान ठरेल, असेही पत्रात म्हटले आहे.