केज : आडस येथे दारूच्या नशेत तर्रर्र असलेल्या पाच मद्यपीनी चहा पिल्या नंतर वेटरने चहाचे पैसे मागितल्याचा राग आल्याने त्यांनी वेटरला चहाच्या थर्मासने मारहाण करून जखमी केले आहे. या बाबतची माहिती अशी की, आडस येथे विजय भाऊसाहेब काळे यांचे धारूर रोडवर कृषी उत्पन्न बाजार समिती समोर हॉटेल गावगप्पा बासुंदी चहा नावाचे हॉटेल आहे.
दि २ ऑगस्ट रोजी सायंकाळ ६:३० वा च्या सुमारासच दरम्यान विजय काळे यांना आप्प्या आडंगुले याने अभिजीत देशी दारुच्या दुकानाचे बाजुला चहाची ऑर्डर दिली. विजय काळे हे तेथे चहा घेऊन गेले त्या वेळी आप्या आडंगुले, राजा वाघमारे, कांबळे, प्रदीप वाघमारे उर्फ खजुर आणि राजु शेख हे दारुचे नशेत तर्रर्र होते. ते सर्वजण चहा पिले. त्या नंतर विजय काळे यांनी त्यांना चहाचे बिल मागितले असता, कशाचे चहाचे पैसे ? असे म्हणून त्यांनी विजय काळे यांच्या हातातील चहाचा थर्मास हिसकावून घेतला. तुझे कशाचे पैसे उपऱ्या ? असे म्हणुन शिवीगाळ केली. राजा वाघमारे व आप्या आडंगुले यांनी चहाचा थर्मास विजय काळे यांच्या डोक्यात मारुन दुखापत केली. राजा वाघमारे याने त्याच्या बेल्टने कपाळावर मारले व कांबळे याने छातीवर लाथा बुक्याने मारहाण केली. त्या सर्वांनी काळे याचे चहाचे कप, थर्मास व चष्मा फोडुन नुकसान केले.
मारहाणीत जखमी झालेल्या विजय काळे यांच्यावर धारूर येथील सरकारी दवाखान्यात प्रथमोपचार करून त्यांना अंबाजोगाई येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. उपचारा नंतर विजय काळे यांनी धारूर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारी वरून आप्या आडंगुले, राजा वाघमारे, कांबळे, प्रदीप वाघमारे उर्फ खजुर आणि राजु शेख या पाच जणांच्या विरुद्ध गु. र. नं. २८२/२०२५ भा. न्या. सं. ११५(२), ११८(१), १८९(२), १९०, १९१(२), १९१(३), ३२४(४), ३२४(५), ३५१(२), ३५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाय्यक पोलिस निरीक्षक देविदास वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल लक्ष्मीकांत पवार हे तपास करीत आहेत.
गुन्हेगारांची मग्रुरी मारहाणीत जखमी झालेल्या विजय काळे यांना त्यांचे आई-वडील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी घेऊन गेले असता तेथे राजा वाघमारे, प्रदीप वाघमारे आणि राजु शेख या तिघांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.