Breaking
Updated: नोव्हेंबर 15, 2025
*दरडवाडीत घरफोडी; २ लाख ६२ हजारांचा ऐवज लंपास*
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई : दरडवाडी येथे झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी २ लाख ६२ हजार ७०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी बर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. ही घटना १२ नोव्हेंबरच्या रात्रीपासून १३ नोव्हेंबरच्या पहाटेपर्यंतच्या कालावधीत घडली.
शिवाजी बाबुराव दराडे, वय ६०, रा. दरडवाडी यांनी फिर्याद दिली आहे. नमूद कालावधीत अज्ञात आरोपींनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातून ८०,००० रुपये रोख रक्कम, तसेच सोन्या-चांदीचे दागिने १,८२,७०० रुपये, असा एकूण २,६२,७०० रुपयांचा मुद्देमाल चोरीस नेल्याचे फिर्यादीने सांगितले आहे.
गुन्ह्याचा तपास पोउपनि घुले यांच्याकडे आहे.