Breaking
Updated: मार्च 10, 2026
केजमध्ये महावितरण आणि ग्राहक यांच्यात संघर्ष पेटला !
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelगुन्हा दाखल करण्याच्या मागणी महावितरणाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा पोलिस ठाण्या समोर ठिय्या तर दिव्यांग ग्राहकाचे रस्ता रोको; महावितरण विरोधात दलित संघटनाही आक्रमक
केज:- वीज बिल आणि नवीन स्मार्ट मीटर बदलीसाठी विरोध केल्याने केज येथील महावितरणच्या अधिकाऱ्यांनी एका दिव्यांग वीज ग्राहकावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी केज पोलिस ठाण्या समोर ठिय्या दिला आहे. तर दिव्यांग वीज ग्राहकाने केज धारूर रोडवर आडवे पडून रस्ता रोको आंदोलन सुरू केले. यात दलित संघटनांनी महावितरणच्या मनमानी विरुद्ध एल्गार पुकारला आहे.
या बाबतची माहिती अशी की, केज येथील बीड रोड लगत राहत असलेले दलित महासंघाचे दिव्यांग कार्यकर्ते विनायक लोंढे यांनी महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याच्या आरोपा वरून केज येथील महावितरणच्या सहाय्यक अभियंता शीतल सय्यद आणि त्यांचे कर्मचारी हे दि. १० मार्च रोजी केज पोलिस ठाण्यात जमा झाले होते. त्यांनी विनायक लोंढे यांच्या विरुद्ध पोलीस तक्रार दाखल करून घेत नसल्याचा आरोप करून, जो पर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही; तो पर्यंत ते सर्वजण पोलिस ठाण्या समोर ठिय्या देऊन काम बंद करण्याचा इशारा दिला आहे.
कनिष्ठ अभियंता शीतल सय्यद यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले आहे की, विनायक लोंढे यांनी स्मार्ट मीटर बसविण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला अश्लील शिवीगाळ केली. तसेच त्यांनी व त्यांच्या पत्नीनी कार्यालयात घुसून कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना देखील अश्लील व अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली आहे. मात्र सदर व्यक्ती दिव्यांग असल्याने त्यांनी काही वेळ दुर्लक्ष केले. मात्र या वारंवार होणाऱ्या प्रकारामुळे कर्मचाऱ्यात असुरक्षिततेची भावना निर्माण होऊन भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे विनायक लोंढे यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केला व त्यांच्या कर्तव्यापासून परावृत करण्याचा प्रयत्न केला आणि शिवीगाळ करून धमक्या दिल्या. परंतु पोलिस गुन्हा दाखल करून घेत नसल्याचा त्यांनी पोलिसांवर देखील आरोप केला आहे.
जो पर्यंत गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत सर्व कर्मचारी हे. पोलिस ठाण्या समोर ठिय्या देऊन काम बंद आंदोलन करण्यात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर वीज ग्राहक विनायक लोंढे यांनी वीज वितरणाच्या कर्मचारी आणि अधिकारी हे मागासप्रवर्ग आणि दिव्यांग व्यक्तींना विनाकारण त्रास देत असल्याने त्यांनी केज धारूर रस्त्यावर आडवे झोपून रस्ता रोको आंदोलन केले.
त्यांनी वीज वितरणच्या अधिकाऱ्यावर ॲट्रॉसिटी आणि अपंगांची केलेली हेळसांड व अवमान प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे.
______________________________
दलित संघटना देखील झाल्या आक्रमक :- विनायक लोंढे यांच्या आंदोलनाला बहुजन विकास मंचाचे तालुका अध्यक्ष लखन हजारे यांनी पाठिंबा दिला असून वीज वितरणाची मुजोरी मोडून काढण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. केज शहर आणि परिसरात भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे. ______________________________
” पोलिसांच्या एका कॉल वर आमचे कर्मचारी धावत जाऊन विद्युत पुरवठा दुरुस्त करतात पण पोलिस आमची तक्रार नोंदवून घेत नाहीत. ”
— शीतल सय्यद,
कनिष्ठ अभियंता, महावितरण, केज
______________________________
” धनदांडगे आणि सरकारी कार्यालये व अधिकारी यांच्याकडे लाखो रु. ची थकबाकी असताना सय्यद मॅडम या गरीब आणि मागास प्रवर्गातील ग्राहकांना त्रास देत आहेत.”
— विनायक लोंढे,
केज तालुका अध्यक्ष, दलित महासंघ
______________________________
” महावितरणच्या कनिष्ठ अभियंता शीतल सय्यद या हेतुप्रस्कृपणे मागासवर्गीय ग्राहकांना वेठीस धरीत आहेत. धनदांडग्यांना वेगळा न्याय आणि सामान्य व गरीबांना जर धाक दाखवीत असतील तर त्यांना निलंबित करण्यात यावे.”
—- लखन हजारे
केज तालुका अध्यक्ष, बहुजन विकास मंच
______________________________
सरकारी कार्यालयासाठी नियम पायदळी :-
दरम्यान कनिष्ठ अभियंता शीतल सय्यद यांनी स्पष्ट केले आहे की, केज येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाचे वीज बिल थकीत असल्याने त्यांचा विद्युत पुरवठा दूर नियंत्रक पद्धतीने खंडित करण्यात आला होता. परंतु पोलीस अधिकाऱ्यांचा फोन येताच त्यांनी नियम धाब्यावर बसवून अनधिकृतपणे विद्युत पुरवठा जोडून दिला. मग त्यांच्यावर देखील कारवाई व्हायला हवी. सामान्य साठी कठोर न्याय आणि अधिकारी व धनदांडग्यासाठी लवचिक धोरण. याची चर्चा सुरू आहे.
______________________________