Breaking

दहावी, बारावी परीक्षा केंद्र परिसरात मनाई आदेश

Updated: June 27, 2025

By Vivek Sindhu

दहावी, बारावी परीक्षा केंद्र परिसरात मनाई आदेश

WhatsApp Group

Join Now

बीड – जिल्ह्यामध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा जून-जुलै-2025 आयोजित केल्या आहेत. बारावीची 16 जुलैपर्यंत आणि दहावी 8 जुलैपर्यंत परीक्षा आहे. या परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात व परीक्षेचे साहित्य ठेवलेल्या ठिकाणी शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी, अनाधिकृत कृत्य होऊ नये याकरीता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आल्याचे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी निर्गमित केले आहेत.

परीक्षेच्या कामकाजासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांना आदेश लागू राहणार नाहीत. परीक्षा केंद्राबाहेर व परिसरात परीक्षेसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी व परीक्षार्थी यांना वगळून दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. परीक्षा केंद्राचे 100 मी परिसरातील सर्व झेरॉक्स केंद्र, फॅक्स केंद्र व ध्वनीक्षेपक इ. परीक्षा सुरु होण्याच्या एक तास अगोदरपासून ते परीक्षा पेपर संपेपर्यंतच्या कालावधीपर्यंत चालू ठेवण्यासाठी प्रतिबंध करण्यात येत आहे. शासकीय व परीक्षेसंबंधित कर्मचाऱ्यांच्या व विद्यार्थ्यांच्या वाहनाव्यतिरीक्त इतर अनाधिकृत वाहनांना परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात येण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. हे आदेश कोणत्याही धार्मिक कार्यक्रम, मयताची अंत्ययात्रासाठी लागू राहणार नाहीत, असेही आदेशात नमूद आहे.

बीड जिल्हयाच्या हद्दीतील परीक्षा केंद्राचे 100 मी परिसरात व परीक्षा साहित्य ठेवलेल्या ठिकाणी 08 जुलैपर्यंतच्या कालावधीत त्या-त्या दिवशीच्या परीक्षेच्या वेळेच्या एक तास अगोदर ते परीक्षा पेपर संपेपर्यंतच्या कालावधीसाठी आदेश लागू राहतील, असेही आदेशात नमूद आहे.