Breaking

दहा लाखांसाठी सासरच्यांनी विवाहितेला संपवले

Updated: ऑगस्ट 30, 2025

By Vivek Sindhu

दहा लाखांसाठी सासरच्यांनी विवाहितेला संपवले

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड – बीड जिल्ह्यात मारहाण, दरोडा, खून अशा घटना थांबायचं नाव घेत नाहीत. अशातच वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती बीडमध्ये घडली आहे. बीडच्या शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतील बावी येथे करिष्मा सांगळे या विवाहित महिलेला सासरच्यांनी विष पाजून मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

करिष्मा सांगळे यांच्या आईवडिलांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. तुझ्या आई-वडिलांकडून दहा लाख रुपये घेऊन ये. नाहीतर तुला मारुन टाकू. दोन दिवसांपूर्वी सासरच्या लोकांनी करिष्माला धमकी दिली होती. त्यानंतर आम्ही 50 हजार रुपये पाठवले होते. आमची परिस्थिती देण्यासारखी नव्हती. त्या लोकांनी याचा गैरफायदा घेतला, असा आरोप मृतक करिष्माच्या कुटुंबीयांनी केला आहे.

आमच्या मुलीला वारंवार टॉर्चर केले. सासरकडचे तिला त्रास द्यायचे. तुझ्या आईवडिलांकडून, भावांकडून पैसे घेऊन ये, नाहीतर घरी येऊ नको. घर बांधायचं आहे, तू पैसे घेऊन आलीच पाहिजेस अशा धमक्या ते लोक द्यायचे. हा धमक्यांचा, जाच आणि छळाचा प्रकार मागील एका वर्षांपासून सुरु होता, असे करिष्माच्या आईवडिलांनी म्हटले आहे.

28 ऑगस्ट रोजी करिष्माला तिच्या सासरच्यांनी विष पाजून मारले असा आरोप कुटुंबियांनी केला आहे. या प्रकरणात आरोपी अद्याप मोकाट आहेत. त्यांना तात्काळ शोधण्यात यावे अशी मागणी करिष्माच्या कुटुंबाने केली आहे. मयत करिष्मा सांगळे हीला अडीच वर्षांची मुलगी आहे. या घटनेमुळे ही मुलगी पोरकी झाली आहे.


Categories

Recent Posts