Breaking

बीडमध्ये टायगर ग्रुप जिल्हाध्यक्षाच्या वाढदिवस रॅलीवर गुन्हा

Updated: सप्टेंबर 16, 2025

By Vivek Sindhu

गप्पेवाडीत वृद्ध महिलेसह भाच्यावर हल्ला, नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड : शहरातील सुभाष रोड परिसरात परवानगीशिवाय टायगर ग्रुपच्या जिल्हाध्यक्ष राकेश जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त काढण्यात आलेल्या बेकायदेशीर मोटारसायकल व कार रॅलीवर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.

सोमवारी सायंकाळी 7 वाजता राकेश जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त अजिंक्य सुरवसे, क्रेन मालक नवले यांच्यासह इतरांनी कोणतीही परवानगी न घेता रॅलीचे आयोजन केले. या रॅलीत तब्बल 45 जण सहभागी झाले होते. रस्त्यावर क्रेन आणि वाहने उभी करून वाहतूक कोंडी केली तसेच लोकांच्या जीवितास धोका निर्माण झाला. जिल्हाधिकाऱ्यांच्या जमाबंदी आदेशाचे उल्लंघनही झाले.

या प्रकरणी बीड शहर पोलिसांनी आयोजक अजिंक्य सुरवसे, क्रेन मालक नवले, राकेश जाधव व अन्य 45 जणांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम 223, 285, 189(2) सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 137(1)(3), 135 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

सुभाष रोडसारख्या अरुंद रस्त्यावर आधीच वाहतुकीचा ताण असताना अशा बेकायदेशीर रॅलींमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. फटाके फोडणे, मोठमोठ्या क्रेन उभ्या करणे यामुळे जीवितासही धोका निर्माण झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.


Categories

Recent Posts