Breaking
Updated: फेब्रुवारी 13, 2026
ऐन उमेदीत स्वप्न भंगले ; कुटूंबाचा आधार गेला
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelऐन उमेदीत स्वप्न भंगले ; कुटूंबाचा आधार गेला
बीड – बीड जिल्हाला ऊसतोड कामगार, शेतमजुरांचा जिल्हा असलेली ओळख पुसण्याचे काम शैक्षणिक जोरावर येथील ऊसतोड कामगार, कष्टकरी, अल्पभूधारक शेतकऱ्यांची पाल्य, युवक करत असून बीड जिल्ह्यात पोलीस भरती दरम्यान शारीरिक चाचणी पश्चात दीपक व्हावळे या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ऐन उमेदीच्या काळात स्वप्नभंग होत कुटूंबाचा आधार गेल्या. सरकारने या घटनेप्रति सहानुभूती दाखवत मयत दीपक व्हावळे कुटूंबियांना आर्थिक मदत देऊ करत कुटूंबाला आधार द्यावा अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष बीड यांनी केली आहे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष बीडच्या शिष्टमंडळाने शुक्रवार दि 13 रोजी मयत दीपक वाव्हळे यांच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले. जिल्ह्यातील असंख्य युवक हे प्रतिकूल परिस्थितीत विविध स्पर्धा परीक्षा देत जिल्ह्याची ओळख निर्माण करण्याचे काम करत असून अनेक ठिकाणी शारीरिक चाचणी देखील देत असतात. पोलीस भरती किंवा सैन्य भरतीमधील शारीरिक चाचणी दरम्यान अशा मृत्यूच्या घटना घडणे ही आता एक गंभीर बाब बनली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने वंचित, कष्टकरी आणि गरीब घटकातील ग्रामीण भागातील तरुण- तरुणी आपल्या भविष्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी होतात. मागील घटनांचा काही अनुभव घेता, भरती प्रक्रियेदरम्यान प्रशासनाने अधिक सतर्क राहणे गरजेचे असून मैदानावर उमेदवारासाठी योग्य सोयी-सुविधा आणि आरोग्याची व्यवस्था करणे ही शासनाची नैतिक जबाबदारी असताना ह्या चाचणी दरम्यान घराचा आधार असलेला तरुण अशा प्रकारे जीव गमावतो, तेव्हा त्याचे संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडते आणि त्यांचे भविष्य अंधकारमय होते. अनेक ठिकाणी असलेल्या सुविधेचा अभाव सहन करत उमेदवाराना वेगवेगळ्या चाचण्या द्यावे लागतात. बीड पोलीस भरती दरम्यान शारिरीक चाचणी पश्चात परळी तालुक्यातील मांडेखेल येथील दीपक भास्कर वाव्हळे देखील या असुविधेचा शिकार बनला असून त्याचा मृत्यू ही दुर्देवी आणि संतापजनक घटना होय. अत्यंत हालाकीची परिस्थिती असलेल्या व्हावळे कुटूंबियांना सरकारने तात्काळ शासकीय मदत देऊन आधार द्यावा, भरती प्रक्रियेच्या ठिकाणी उमेदवारासाठी जेवण, नाश्ता, आरोग्य पथक व आरामाची चोख व्यवस्था करावी व अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडणार नाहीत याची शासन आणि प्रशासन यांनी काळजी घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. या सांत्वनभेटी दरम्यान माकप जिल्हा सचिव कॉ.ऑड.अजय बुरांडे, कॉ.मुरलीधर नागरगोजे, कॉ.अशोक नागरगोजे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.