Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

आज्जीच्या दिवसासाठी गावाकडे जात असलेल्या दाम्पत्याला अडवून लुटले

Updated: फेब्रुवारी 18, 2026

By Vivek Sindhu

आज्जीच्या दिवसासाठी गावाकडे जात असलेल्या दाम्पत्याला अडवून लुटले

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

गौतम बचुटे/केज :- आज्जीच्या दिवसाच्या कार्यक्रमासाठी दुचाकीवरुन गावाकडे जात असलेल्या दाम्पत्याला मोटार सायकल आडवी लावून गळ्यातील सोन्याचे लॉकेट लुटून चोरटे पसार झाल्याची घटना केज तालुक्यातील सुर्डी पाटी ते सुर्डी दरम्यान घडली आहे.

या बाबतची माहिती अशी की, बुधवारी दि.१८ फेब्रुवारी रोजी कळंब जि. धाराशिव येथे राहत असलेले सेवानिवृत्त चालक शिवाजी श्रीराम भिसे व त्यांची पत्नी सौ. सुरेखा भिसे हे दोघे पती-पत्नी त्यांचे नातेवाईक कै. प्रयागाबाई भिसे यांच्या तिसऱ्या दिवसाच्या क्रियाकर्मासाठी सुर्डी सोनेसांगवी या गावाकडे जात असताना सुर्डी फाटा ते सुर्डी-सोनेसांगवी दरम्यान रस्त्यावर मोटार सायकलवर आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या मोटार सायकली समोर त्यांची मोटार सायकल आडवी लावून त्यांना अडविले. त्या नंतर शिवाजी भिसे यांच्याशी बोलू लागले. त्या मुळे शिवाजी भिसे हे संमोहित झाले आणि त्यांनी त्या तंद्रीत त्यांनी स्वतः हून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे लॉकेट काढून दिले. ते लॉकेट घेऊन ते दोघे मोटार सायकल वरून पसार झाले.

त्या नंतर शिवाजी भिसे यांनी ही माहिती पोलिसांना देताच पोलिसांनी तपास सुरू केला असून त्यांच्या जाण्या-येण्याच्या मार्गावरील सीसीटीव्हीचे व्हिडिओ व त्याचे फुटेज हस्तगत करून त्याचे तपासणी करीत आहेत. 

अद्याप या प्रकरणी युसुफ वडगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे हे चौकशी करीत असून अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.


Categories

Recent Posts