Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

दाम्पत्यास विळा, गजाने मारहाण ; चौघांवर गुन्हा

Updated: जानेवारी 2, 2026

By Vivek Sindhu

चौघांविरोधात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज – तीन वर्षांपूर्वी आंतरजातीय विवाह केलेल्या मुलाच्या आई – वडिलांना मुलीच्या आई, वडिलांसह अनोळखी दोघांनी लोखंडी गज व विळ्याने मारहाण केल्याची घटना वाघेबाभळगाव (ता. केज) येथे घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
वाघेबाभूळगाव येथील विजया शिवाजी वाघ यांचा मुलगा शरद वाघ याने तीन वर्षांपूर्वी गावातील वैष्णवी हिच्यासोबत आंतरजातीय विवाह केला होता. २८ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता विजया वाघ व त्यांचे शिवाजी वाघ हे दोघे कांद्याचे रोप आणण्यासाठी बाळु शेलार यांच्या शेतात गेले होते. त्याठिकाणी त्यांच्या मुलाची पत्नी वैष्णवी हिचे वडील विलास ठोंबरे, पत्नी जयमाला ठोंबरे व इतर अनोळखी दोघे आले. विलास याने शिवीगाळ करीत लोखंडी गजाने विजया वाघ यांच्या डोक्यात मारून डोके फोडले. तर जयमाला ठोंबरे यांनी विळा मारल्याने त्यांची गळ्यातील पोत तुटून पडली. तर त्यांचे पती सोडविण्यास आले असता दोघा अनोळखी लोकांनी काठीने या दोघांना हातावर, पायावर, पाठीवर जबर मारहान करून गंभीर जखमी केले. या मारहाणीत विजया वाघ यांच्या डोक्याला पाच टाके पडले असून हात आणि करंगळी फॅक्चर झाली आहे. विजया वाघ यांच्या फिर्यादीवरून विलास ठोंबरे, जयमाला ठोंबरे व दोन अनोळखी विरुद्ध केज ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश क्षीरसागर हे करीत आहेत.


Categories

Recent Posts