Breaking
Updated: जानेवारी 17, 2026
आष्टीमध्ये घरफोडी; चोरट्यांनी लांबवले एक लाखाचे सोने
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelधारूर : तेलगाव येथील एका देशी दारूच्या दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी १ लाख ८६ हजार रुपयांची रोकड चोरून नेली आहे. ही घटना १५ जानेवारीच्या मध्यरात्री घडली असून यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
तेलगाव येथील देशी दारूच्या दुकानाचे मॅनेजर दत्ता जालिंदर माने यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. १५ जानेवारी रोजी रात्री १० वाजता दुकान बंद केल्यानंतर अज्ञात चोरट्याने दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी गल्ल्यातील ५००, २०० आणि १०० रुपयांच्या नोटांचे बंडल असा एकूण १ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. १६ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता दुकान उघडायला गेल्यावर हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक जपाळे पुढील तपास करत आहेत.