Breaking
Updated: मार्च 17, 2026
ग्राहक गॅस सिलिंडरच्या प्रतिक्षेत
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई (प्रतिनिधी) – जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस प्लांटला लागणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा कमी झाल्याने अंबाजोगाई शहर व तालुक्यात एलपीजी गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याचे जाणवत आहे. परिणामी ग्राहकांना सिलिंडरसाठी अधिक दिवस प्रतीक्षा करावी लागत असून घरगुती वापरावरही त्याचा परिणाम होत आहे.
पूर्वी गॅस सिलिंडरचे बुकिंग केल्यानंतर तात्काळ सिलिंडर मिळत होते. आता तीन, तीन दिवसांचे वेटिंग राहात आहेत. पूर्वी दर १५ दिवसांत सिलिंडर मिळत असे. सध्या मात्र हा कालावधी वाढून जवळपास २५ दिवसांपर्यंत गेला आहे. त्यामुळे ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान,
शंभर टक्के ओटीपी प्रणाली लागू करण्यात आल्यामुळे सिलिंडर वितरण प्रक्रियेत अधिक काटेकोरपणा आणण्यात आला आहे. एच.पी.गॅसचे हजारो ग्राहक व इतर कंपन्यांचे ग्राहक अशी मोठी ग्राहक संख्या आहे.
यापूर्वी लगेच सिलिंडर मिळायचे.गेल्या काही दिवसांपासून पुरवठ्यात मोठी घट झाली आहे.सध्या गॅस सिलिंडर बुकिंग केल्यानंतर ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागत असून यामुळे घरातील कामकाज विस्कळीत झाले आहे.शहरासह ग्रामीण भागातही गॅस टंचाईची परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान सिलिंडरच्या दरातही सुमारे ६० रुपयांची वाढ झाली आहे. सिलिंडरची आवक कमी झाल्याने आणि मागणी वाढल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे लवकरच गॅसचा पुरवठा सुरळीत व्हावा अशी अपेक्षा ग्राहकांकडून व्यक्त होत आहे.