Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

पती इच्छे विरुद्ध अनैसर्गिक कृत्य करून हिंसाचार करीत असल्याची तक्रार

Updated: फेब्रुवारी 4, 2026

By Vivek Sindhu

ऊसतोड मजुराचे कष्टाचे 9 लाख अन् सोने लंपास

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज : केज तालुक्यातील एका विवाहितेने तिचा पती हा तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी अनैसर्गिक पद्धतीने शरीरसंबंध करून फ्लॅट घेण्यासाठी दहा लाखाची मागणी करून तिचा शारीरिक व मानसिक छळ करीत असल्या प्रकरणी नवऱ्यासह सासू सासरे आणि दोन नंदा आणि नंदावी अशा सहा जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

केज तालुक्यातील एका गावात एका विवाहित महिलेचा पती हा तिच्याशी जबरदस्तीने वारंवार अनैसर्गिक पद्धतीने शरीरसंबंध करून फ्लॅट घेण्यासाठी बाहेरहून दहा लाख रु. ची मागणी केली.तिचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला मारहाण करीत आहे. तसेच कुटुंबातील  सदस्य देखील तिचा शारीरिक व मानसिक छळ करून पैशाची मागणी करीत आहेत.

या प्रकरणी सदर महिलेने केज पोलीस ठाण्यात तिच्या पती आणि सासू, सासरे, दोन नंदा व दोन नांदावी अशा सात जणांच्या विरुद्ध गु. र. नं. ५२/२०२६ भा. न्या. सं. ८५, ६४, ११५(२), ३५१(२),३५२, ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पिंक पथकाचे पोलिस उपनिरीक्षक प्रकाश शेळके हे तपास करीत आहेत.


Categories

Recent Posts