Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

दोन हजार विद्यार्थ्यांनी घेतला संगभरण स्पर्धेत सहभाग

Updated: फेब्रुवारी 19, 2026

By Vivek Sindhu

शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने झाली स्पर्धा

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने झाली स्पर्धा

अंबाजोगाई -: कोणी छत्रपती शिवाजी महाराजांचे, तर कोणी किल्ल्यांचे, तर कोणी मावळ्यांचे असे विविध प्रकारचे चित्र रेखाटून व त्यात आपल्या आवडीचे रंग भरत २ हजार शालेय विद्यार्थ्यांनी या चित्रकला स्पर्धेचा आनंद घेतला.
गुरुवारी सकाळी श्री. खोलेश्वर विद्यालयाच्या प्रांगणात येथील शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने अंबाजोगाई शहरातील विद्यार्थ्यांसाठी
रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून साहित्यिक दगडू लोमटे, ज्ञान प्रबोधिनीचे समन्वयक प्रसाद चिक्षे,संयोजन समितीचे महेश लोमटे, प्रवीण देशमुख, उमेश डोंगे, गणेश कदम, यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना दगडू लोमटे म्हणाले की विद्यार्थ्यांच्या विविध चित्रातून खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन झाले. अशा स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे लोमटे यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजन समितीचे सदस्य नगरसेवक महेश लोमटे यांनी केले.


Categories

Recent Posts