Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

अंबाजोगाईत सामुहिक महाकामेष्टी यज्ञ व सामुहिक श्रीसूक्त हवन

Updated: जानेवारी 10, 2026

By Vivek Sindhu

अंबाजोगाईत सामुहिक महाकामेष्टी यज्ञ व सामुहिक श्रीसूक्त हवन

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई, दि. ९ येथील यज्ञ सेवा समिती व पाटील चौकातील श्रीराम मंदिराच्या वतीने शनिवारी (दि.१०) दुपारी श्रीसूक्त हवन व रविवारी (दि.११) यज्ञ मार्तंड तथा बहुसोमयाजी दिक्षित यज्ञेश्वर महाराज सेलूकर यांच्या उपस्थितीत सामुहिक महाकामेष्टी यज्ञ होणार आहे.
या यज्ञ सोहळ्यानिमित्त शनिवारी (ता.१०) दुपारी साडेतीन वाजता सेलूकर महाराज व गदाधरबुवा रामदासी यांच्या उपस्थितीत शोभायात्रा निघणार आहे. योगेश्वरी देवीच्या मंदिरात शोभा यात्रा विसर्जित होऊन, मंदिरातच सेलूकर महाराज व बाळूमहाराज नाव्हेकर यांच्या उपस्थितीत श्रीसूक्त हवन होणार आहे. याच दिवशी रात्री आठ वाजता श्रीराम मंदिरात बाळूमहाराज नाव्हेकर यांचे कीर्तन होणार आहे.
श्रीराम मंदिराचे मठाधिपती गदाधरबुवा रामदासी यांच्या मार्गदर्शनाखाली हा यज्ञ सोहळा होत आहे. रविवारी (दि.११) सकाळी सात वाजता शिष्य परिवाराचा गुरुमंत्र विधी, नऊ वाजता सत्यअंबा पूजन होईल. सकाळी १० वाजता मुख्य महाकामेष्टी यज्ञ हवनाला सुरूवात होईल. दुपारी १ ते ४ यावेळेत महाप्रसाद होईल. भाविक व शिष्य परिवाराने या यज्ञ सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीराम मंदिर व यज्ञ सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.


Categories

Recent Posts