अंबाजोगाई -: जन्मताच हात पाय वाकडे असलेल्या बालकांवर क्लब फूट द्वारे
उपचार करून त्यांना दुरुस्त करण्याचे काम गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे.मंगळवारी
स्वा.रा.ती.रुग्णालयात
क्लब फूट डे निमित रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी व
क्यूर इंडिया यांच्या वतीने जनजागृती शिबीर राबविण्यात आले.
आज पर्यंत उपचार झालेल्या बालकांच्या उपस्थितीत हा उपक्रम राबवण्यात आला.या कार्यक्रमासाठी अस्थिरोग विभागाचे डॉ.रोहित काकानी, रोटरीचे अध्यक्ष कल्याण काळे, सचिव धनराज सोळंकी,मोईन शेख,भीमाशंकर शिंदे,रोहिणी पाठक,भागवत कांबळे,राजेंद्र घोडके, क्यूर इंडियाच्या अश्विनी पांचाळ,पूजा धोत्रे यांची उपस्थिती होती.
क्यूर इंडियाच्या वतीने जन्मताच हात पाय वाकडे असणाऱ्या बालकांचा शोध घेतला जातो.तर रोटरी क्लब या साठी तयार करण्यात येणाऱ्या क्लब फूट साठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध करून देते. तर स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील अस्थिरोग विभागातील डॉक्टर या बालकांवर उपचार करतात.असा हा संयुक्तिक उपक्रम गेल्या चार वर्षांपासून राबविण्यात येतो.आज पर्यंत ६५ बालकांवर उपचार झाले असून ही सर्व बालके आज पूर्ववत झाली आहेत.
समाजात अशा बालकांचा शोध घेऊन त्यांचे अपंगत्व दूर करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा.असे आवाहन यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष कल्याण काळे यांनी केले. यावेळी सचिव धनराज सोळंकी यांनी उपचारासाठी लागणारे साहित्य कायम स्वरुपी पुरविण्याचे आश्वासन दिले.यावेळी मोईन शेख,रोहिणी पाठक,भीमाशंकर शिंदे,यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी अपंगत्व निवारण झालेल्या बालकांच्या हस्ते डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला. दीपप्रज्वलन व धन्वंतरी पूजनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्यूर इंडियाच्या अश्विनी पांचाळ यांनी केले. यावेळी डॉ.विपिन कुमार,डॉ.अभिषेक ढेंगे,डॉ.उत्कर्ष शर्मा,डॉ.पंकज लोढा,ड डॉ.शंतनू वानखेडे, आशा सेविका, व रोटरी क्लब चे सदस्य उपस्थित होते.