Breaking

चौसाळा शहरातुन पुन्हा मोटारसायकल चोरीला

Updated: May 29, 2025

By Vivek Sindhu

चौसाळा शहरातुन पुन्हा मोटारसायकल चोरीला

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा

Join Group

बीड – नेकनुर पोलिस स्टेशन हद्दीतील चौसाळा परिसरात चोरटयानी धुमाकूळ घातला असुन एका मागे एक चोरीच्या घटना घडताना पाहावयास मिळत असुन नेकनुर पोलीस फक्त बघायची भुमिका घेत असल्यामुळे पोलीसाच्या कार्यप्रणाली वरती प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे. चौसाळा शहरातील पांडुरंग कळासे या शेतकर्‍याच्या दहा शेळया चोरीला गेल्या आहेत.

तसेच नांदुर रस्तया नजीक असलेल्या तुकाराम जोगदंड यांची 25000 हजार रूपये किमतीची मोटार चोरीला गेली त्याच बरोबर पालसिंगन येथिल पवनचक्की च्या आर्म क्रास कट करून तब्बल अडीच लाख रूपयाची ऐल्युमिनियम तारेची चोरी झाली.

तसेच चौसाळा बायपास वरती सामाजिक कार्यकर्ते विवेक कुचेकर यांना लुटण्याचा प्रयन्त झाला. या सर्व घटना ताज्याअसतानाच काल राञी चौसाळा शहरातील मुक्ताईनगर येथुन विठ्ठल नांदे यांची युनिकोर्न कंपनीची मोटारसायकल चोरीला गेली आहे.

या मोटारसायकलचोरी करताना चोरटे सिसिटीव्ही मध्ये कैद झाले असुन चौसाळा पोलीस चोकिला विठ्ठल नांदे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात तिन चोरटया विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परंतु या मोटारसायकल चोरीचा तपास लागणार का? चौसाळा परिसरातील चोरयाची मालिका थांबणार का? चौसाळा बायपास वरील लुटमारीच्या घटना थांबणार का? कर्तव्यदक्ष एस पी साहेब चौसाळा परिसर चोरटयाला आदन दिला का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.