Breaking

केजमधील घर चोरटयांनी फोडले

Updated: June 22, 2025

By Vivek Sindhu

चोरटयांनी फोडले

WhatsApp Group

Join Now

केज – शहरातील कानडीमाळी रोडवर असलेल्या पत्र्याच्या शेडचा दरवाजा उघडून मंगळवार (दि.१७) रोजी अज्ञात चोरटयांनी सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण ८२,००० रुपयांचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीराम नारायण राऊत (वय ७४) रा.कानडीमाळी रोड केज यांच्या घराचा दरवाजा उघडून मंगळवार (दि.१७) रोजी अज्ञात चोरटयांनी सोन्याचे ५ ग्रॅमचे झुबर,२ ग्रॅमची नथ,११.०५ ग्रॅमचे गंठण,दीड ग्रॅमची अंगठी असे एकूण २० ग्रॅम सोने प्रति ग्रॅम ४००० रुपये प्रमाणे ८०,००० रुपये व रोख रक्कम दोन हजार रुपये असा एकूण ८२,००० रुपयांचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुरुवार (दि.१९) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत .