Breaking

बीड जिल्ह्यात चोरट्यांचा सुळसुळाट

Updated: June 11, 2025

By Vivek Sindhu

बीड जिल्ह्यात चोरट्यांचा सुळसुळाट

WhatsApp Group

Join Now

बीड- बीड जिल्ह्यात सध्या उघडपणानी चोर हे फिरत असून भर रस्त्यावर महिलेच्या गळ्यातील गंठन ओढून चोरून घेऊन जाण्याच्या घटना ह्या दिवसेंदिवस वाढत आहे.
या घटना घडत असताना शहरातीलसीसीटीव्ही मात्र नेहमी सारखे बंद पडल्याचे दिसत आहे. बीड शहरातील सहयोग नगर परिसरातून एक विवाहित महिलेचे भर दुपारी दोन भामट्यांनी गळ्यातून गंठन ओढून पाल काढला, हे करत असताना विवाहित महिला, थोडक्यात वाचली. तर सध्या चाकार्वाडीत सुरू असलेल्या शिव महापुराण कथेत तीन ते चार महिलांचे
दागिने, भाविकाचे पैशाचे पाकीट हे चोरट्यांनी चोरले आहे. बीड शहरासह जिल्ह्यात गर्दीच्या ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणावर भुरटे चोर फिरताना दिसत आहेत. करोडो रुपये खर्च करून शासनाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा बसवली मात्र ती केवळ नावापुरतीच असल्याचे अनेक घटना मधून समोर आले आहे. त्यामुळे भामट्या चोरांचे यातून फावत आहे. बीड शहरातील अनेक मोठमोठ्या चौकात सीसीटीव्ही बसवले
आहेत, यातून शहरात येणार्‍या जाणार्या प्रत्येकाचे निरीक्षण होणे अपेक्षित असताना दुसरीकडे हे कॅमेरेच बंद असल्याचे दोन तीन घटने मधून समोर आले आहे. सध्या चाकरवाडी येथे लाखो भाविकांच्या उपस्थितीत मध्ये शिव महापुरान कथा कार्यक्रम सुरु असून याठिकाणी तर
चोरटयासाठी ही एक पर्वणीच ठरत आहे.
पहिल्याच दिवशी तीन महिलांचे दागिने, चार पाच जणांचे पैशाचे पाकीट, आणि तीन ते चारा मोबाईल हे चोरीस गेले आहे. या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त
आहे, मात्र तरी अशी घटना घडत आहे, याशिवाय शहरात भर दिवसा जिल्हा रुग्णालयातील कर्मचार्याच्या घरातून सहा लाख नव्वद हजाराचे दागिने याच घरात घरकाम करणार्‍या महिला मजूर लक्ष्मी वडमारे यांनी चोरून नेले आहे. जिल्ह्यात सध्या लग्नसराई, महाशिव पुराण कथा यासह इतर मोठमोठे कार्यक्रम सुरु असून अनेक भामटे हे शहरात रेकी करत फिरत आहेत, त्यामुळे नागरिकांनी आपल्या परिसरात अशी अनोळखी व्यक्ती विनाकारण फिरताना दिसली तर तत्काळ नजीकच्या पोलिस स्थानकाशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले असून गर्दीच्या ठिकाणी महिला तसेच पुरुषांनी सावध राहावे असेही आवाहन केले आहे.