Breaking
Updated: मार्च 7, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई: येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून, या संस्थेच्या इमारतींच्या एकत्रीकरणासाठी आणि विस्तारासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी महत्त्वपूर्ण ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. राज्यातील ३५ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांपैकी नव्याने मान्यता मिळालेल्या ११ महाविद्यालयांची बांधकामे सध्या प्रगतीपथावर आहेत. या पार्श्वभूमीवर, अंबाजोगाई येथील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या वैद्यकीय संस्थेच्या पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी विशेष ‘बृहद आराखडा’ (Master Plan) तयार करण्यात आला आहे. राज्यातील विविध जिल्हा आरोग्य संस्थांच्या बळकटीकरणाची कामे वेगाने सुरू असून, ग्रामीण भागातील जनतेला दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी या उद्देशाने आवश्यक तो सर्व निधी टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. या निर्णयामुळे मराठवाड्यातील आरोग्य व्यवस्थेला मोठी उभारी मिळणार आहे.