अंबाजोगाई : तालुक्यातील चतुरवाडी येथे तीन वर्षांपूर्वी एका अल्पवयीन मुलीचा विवाह झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ग्रामविकास अधिकारी बंडु जांभळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सहा जणांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.